*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
*✤┈┈┈┈••✦MSP✦••┈┈┈┈✤*
*👨🏫 यंदा शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन पद्धतीने होणार; राज्य सरकारने दिले आदेश*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
गजेंद्र बडे
08.14 PM
https://www.esakal.com/maharashtra/transfers-primary-teachers-pune-zilla-parishad-schools-will-be-done-offline-year-321762
*शिक्षकांच्या बदल्या ३१ मे पूर्वी करण्यात येतात. मात्र याआधी यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. परंतू ही स्थगिती मागे घेत येत्या ३१ जुलैपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश ७ जुलैला काढण्यात आला आहे.*
पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या यंदा ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत. या बदल्यांची प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिला आहे. कोरोनामुळे यंदा ऑफलाइन बदल्या करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील एकूण शिक्षकांपैकी १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ मधील नियमांचाच अवलंब करावा आणि बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांचे बदली अर्ज जमा करण्यासाठी तालुकास्तरीय पथके स्थापन करण्यात यावीत, असा आदेशही सरकारने जिल्हा परिषदेला दिला आहे.
दरम्यान, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या पूर्वीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहेत. यासाठी समन्वयक म्हणून नंदूरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी पुणे आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे.
दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या ३१ मे पूर्वी करण्यात येतात. मात्र याआधी यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. परंतु ही स्थगिती मागे घेत येत्या ३१ जुलैपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश ७ जुलैला काढण्यात आला आहे. मात्र या आदेशात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे यंदा आपल्या बदल्या होणार नाहीत, या अपेक्षेने शिक्षकांना दिलासा मिळाला होता, पण या नव्या आदेशामुळे बदल्यांमधून शिक्षकांना सूट नसल्याचे उघड झाले आहे.
*जिल्ह्यात १७०० शिक्षकांच्या बदल्या?*
जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शिक्षकांपैकी जास्तीत जास्त १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्याचे बंधन या आदेशात घालण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे साडेअकरा हजार शिक्षक आहेत. त्यामुळे या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ७०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
═══════🦋🦋═══════
*📋 MAH HSC Result 2020 | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणपडताळणी अर्ज होणार ऑनलाईन*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
By: मानसी देशपांडे, एबीपी माझा15 Jul 2020 08:01 PM (IST)
https://marathi.abplive.com/news/maharashtra/rechecking-and-revaluation-application-for-ssc-and-hsc-students-are-online-789841
दरवर्षी निकाल लागल्यावर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीचे अर्ज देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत: मंडळात जावं लागत होतं किंवा शाळा, महाविद्यालयांच्या मार्फत मंडळात अर्ज द्यावे लागत होते.
पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता संपली आहे. 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण बारावीसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
दरवर्षी निकाल लागल्यावर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीचे अर्ज देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत: मंडळात जावं लागत होतं किंवा शाळा, महाविद्यालयांच्या मार्फत मंडळात अर्ज द्यावे लागत होते. मंडळात अर्ज देणं गरजेचं होते. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा, महाविद्यालयं आणि विभागीय मंडळामध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ही आॅनलाईन प्रक्रिया सुरु होईल.
दहावीचे विद्यार्थी
http://verification.mh-ssc.ac.in
आणि बारावीचे विद्यार्थी
http://verification.mh-hsc.ac.in
या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आँनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.
*बारावीचा निकाल खाली नमुद केलेल्या वेबसाईटवर दिसेल.*
www.mahresult.nic.in/
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लाॅकडाऊनच्या आधी बारवीची परिक्षा जरी संपली होती. मागच्या वर्षी 28 मे 2019 ला बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला होता. पण यावर्षी लाॅकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकुण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकुण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पुर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत.
*🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
Tags
Amazon.in :
